सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत
By दिपक ढोले | Updated: March 16, 2023 17:22 IST2023-03-16T17:21:47+5:302023-03-16T17:22:03+5:30
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात आले आहे.

सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत
जालना : इन्स्टाग्रामवर महापुरुषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चार जणांना जालना पोलिसांनी गुरूवारी पकडले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात आले आहे. रिजवान परसुवाले, शब्बीर परसुवाले (दोघे रा. गवळी पोखरी) व इतर तीन साथीदार अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
जालना तालुक्यातील गवळी पोखरी येथे तीन दिवसांपूर्वी दोघांनी इन्स्टाग्रामवर महापुरूषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याच जाब विचारण्यासाठी मुरलीधर शिंदे हे गेले होते. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी मारहाणीत जखमी मुरलीधर अंकुशराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित रिजवान परसुवाले, शब्बीर परसुवाले (दोघे रा. गवळी पोखरी) व इतर साथीदारांविरुध्द विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित रिजवान परसुवाले याला पोलिसांनी अगोदरच अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शब्बीर परसुवाले व इतर तीन जणांना गुरूवारी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी दिली.