Four houses were demolished in Patur | परतूरमध्ये चार घरे फोडली

परतूरमध्ये चार घरे फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : चोरट्यांनी शहरात चार ठिकाणी घरफोड्या करून ६० हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर शहरात चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास गाव भागात आंबेडकर नगरमध्ये कुसुम यादवराव मगर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख ४० हजार व एक सोन्याची अंगठी असा एकूण ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. तर याच भागातील अशोक गारकर, आसाराम गाडेकर, सुभाषराव बागल यांच्याही घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कुसूम मगर यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रेमसागर लालझरे हे करीत आहेत. दरम्यान, या चोटीच्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Four houses were demolished in Patur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.