शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

शिंदे, फडणवीस, पवार धुरंधर; संभाजी भिडेंनी केलं कौतुक, जरांगेंना आंदोलन मागे घेण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:48 AM

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली.

जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे. त्यांच्या याच उपोषणास्थळी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मी तुमच्यासोबत आहे. तुमची भूमिका योग्य आहे, असं म्हणत संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी संभाजी भिडे गुरुजींचा मला पाठिंबा मिळणं ही भाग्याची गोष्ट असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.  

संभाजी भिडे यावेळी म्हणाले की, मी राजकारणी नसल्याने घुमवून बोलणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १०० टक्के यश मिळणार असून सूर्य नक्की उगवणार असल्याचं संभाजी भिडे यांनी सांगितले. तसेच उपोषण मागे घ्या, लढा सुरु ठेवा, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुरंधर आहेत. देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, असं म्हणत संभाजी भिडे यांनी तिघांचे कौतुकही केले. 

मी कोणाला दबत नाही. मी माझ्या समाजाला दबतो. सरकारच्या म्हणण्यानुसार मी दोन पावले मागं येतो. परंतु, त्यांना वेळ कशाला हवा? आम्हाला टिकणारे आरक्षण मिळणार का? ते सांगावे. माझं गाव भावनिक झालं आहे. महिला रडतायत. ते माझ्या काळजाला लागतेय. त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर ते सोमवारी रात्री पत्रकारांसोबत बोलत होते.

शासनाला वेळ हवा असेल तर तो कशाला हवा आहे आणि आम्हाला कायम टिकणारे आरक्षण मिळणार का हे त्यांनी सांगावे. त्याची उत्तरे मला मिळायला हवीत. गावकरी भावूक झाल्याने मी द्विधामनावस्थेत आहे. उद्या दुपारी सर्वांशी चर्चा करतो आणि सांगतो. समाजाचे भलं होत असेल, कायम टिकणारे आरक्षण मिळत असेल तर आपणही उपोषण लावून धरणार नाही. चर्चेनंतर निर्णय घेवू, असे जरांगे म्हणाले.सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असतील आणि अधिकाऱ्यांना निलंबीत केले असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागत. शासकीय समिती मी आणि माझे सहकारी शासकीय समितीत जाणार नाहीत. आमच्या वतीने समितीत कोणी जाणार नाही. आम्हाला एकच मोह आहे. काही ही करा मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही दोन पावलं मागे येवू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी सोमवारी रात्री घेतली होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार