जालन्याचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 01:20 PM2021-11-01T13:20:42+5:302021-11-01T13:21:10+5:30

Former MP Pundalikrao Danve: पुंडलिकराव दानवे हे १९७७ व १९८९ असे दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होते.

Former Jalna MP Pundalikrao Danve passes away | जालन्याचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे निधन

जालन्याचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे निधन

googlenewsNext

भोकरदन (जालना ) : जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर उद्या ( दि. २) पिंपळगाव सुतार येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबनराव दानवे, सुधाकरराव दानवे ही तीन मुले व एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. चार दिवसांपूर्वी त्यांची पत्नी केशरबाई दानवे यांचे निधन झाले होते. पुंडलिकराव दानवे हे १९७७ व १९८९ असे दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होते.

पुंडलिकराव दानवे यांची राजकीय कारकीर्द

पुंडलिकराव दानवे हे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेते होते. १९७७ मध्ये जनता दलाकडून त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. नंतर ते भाजपकडून चार वेळा लोकसभा लढले, मात्र त्यातील केवळ एक निवडणूकच ते जिंकले. अगदी १९९० पर्यंत जालना जिल्हा म्हणजे पुंडलिकराव दानवे असे समीकरण होते. पुढे जालन्यात रावासाहेब दानवे यांच्या राजकीय कारकीर्दीचा उदय झाला. १९८५ साली रावसाहेब दानवे हजार-दीड हजार मतांनी पराभूत झाले. मात्र, जालन्याच्या राजकारणात त्यांनी आपला जम बसवला. पुढे १९९० मध्ये रावसाहेब दानवे विधानसभेवर निवडून गेले आणि भाजपमध्ये पुंडलिकराव दानवे मागे पडत गेले. पुढे पाचवेळा जालन्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवणाऱ्या पुंडलिकरावांना भाजपने तिकीट नाकारलं आणि नंतर मग रावसाहेब दानवे आणि पुंडलिकरावांमधील अंतर वाढत गेलं.

बस-रिक्षाने प्रवास करणारे खासदार 'पीएचडी' अर्थात पुंडलिकराव हरी दानवे

'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना

Web Title: Former Jalna MP Pundalikrao Danve passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.