चार बालकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:17 AM2017-12-25T01:17:08+5:302017-12-25T01:17:15+5:30

गावात आलेल्या फेरीवाल्याचे भजे-जिलेबी खाल्ल्याने चार बालकांना विषबाधा झाली.

Food poisoning to 4 children | चार बालकांना विषबाधा

चार बालकांना विषबाधा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आंबा : गावात आलेल्या फेरीवाल्याचे भजे-जिलेबी खाल्ल्याने चार बालकांना विषबाधा झाली. परतूर तालुक्यातील एकरूखा गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुलांवर उपचार सुरू आहेत.
परतूर तालुक्यातील एकरूखा येथील साक्षी रखमाजी तरवटे (वय ५), श्रद्धा जयाजी तरवटे (वय ५), मयूरी विष्णू बादड (वय ४) व आकाश विष्णू बादड (वय १०) या बालकांनी रविवारी सायंकाळी गावात आलेल्या फेरीवाल्याकडील जिलेबी व भजे खाल्ले. त्यानंतर त्यांना मळमळ होऊ लागली. आईवडिलांनी बालकांना तातडीने परतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची बालकांची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Food poisoning to 4 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.