द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:41 IST2019-11-04T00:40:55+5:302019-11-04T00:41:16+5:30
द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आधी दुष्काळाने आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पावसावर लावलेले खरीप पिकांचे उत्पादन यंदा आधीच कमी होणार आहे. असे असतांनाच जे उत्पादन होऊन थोडाफार पैसा शेतकऱ्यांच्या हातात आला असता, परंतु आता या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले. गोरंट्याल यांनी रविवारी सकाळपासूनच जालना विधानसभा मतदारसंघातील विविध गावे, वाड्यांना भेटी देऊन थेट शेतात जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक शेतकºयांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला असून, आता हेक्टरी सरासरी २५ हजार रूपयांची मदत मिळाल्यास थोडे बहुत नुकसान भरून निघेल असे सांगितले. यावेळी गोरंट्याल यांनी देखील शेतक-यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तुमच्या वेदना मी समजू शकतो, असे सांगितले. शेतक-यांनी घाबरून न जात ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यावेळी आपण आपल्या मागण्या प्रखरपणाने मांडू अशी ग्वाही गोरंट्याल यांनी दिली.
यावेळी राम सावंत, माऊली इंगोले, अॅड. सोपान शेजूळ, कृष्णा पडूळ, दिलीप मोरे, जालिंधर डोईफोडे, शिवाजी गायकवाड, मारूती पठारे, देवीदास क्षिरसागर, सुभाष राठोड, अरूण ्नचव्हाण यांच्यासह जालन्याचे तहसीलदार भुजबळ, गटविकास अधिकारी तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. गोरंट्याल यांनी रविवारी मौजपुरी, कडवंची, इंदेवाडी, जामवाडी आदी गावांना भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधला.