जालन्यात लूट प्रकरणी पाच जण पोलीसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:04 IST2018-09-17T21:03:48+5:302018-09-17T21:04:32+5:30
या प्रकरणातील पाच जणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालन्यात लूट प्रकरणी पाच जण पोलीसांच्या ताब्यात
जालना : गेवराई येथून गुटख्याचा माल पिकअपने जालन्याकडे घेऊन जात असतांना चालकाला चाकूचा धाक दाखवत रोख १ लाख ६० हजार रुपये, १२ लाखांचा गुटख्यासह पिक लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील पाच जणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवाजी पुतळा येथून एक कार भाड्याने घेऊन हा गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अशफाक तांबोळी, शेख वसीम अल्ताफ, जावेद सलीम शेख (जालना), विशाल संतोष आव्हाड (भिमनगर, जालना), दत्ता अंबादास अंधाळे (काटखेडा ता. अंबड) असे आरोपींचे नावे आहेत. पाचही आरोपींना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.