शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

६१ वर्षांनंतर प्रथमच केदारखेडा ग्रामपंचायतीची सत्ता तरुणाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

केदारखेडा : येथील ग्रामपंचायत स्थापनेला ६१ वर्षे उलटले आहेत. परंतु, प्रथमच येथील सत्ता तरुणांच्या हाती देण्यात आली आहे. आतापर्यंत ...

केदारखेडा : येथील ग्रामपंचायत स्थापनेला ६१ वर्षे उलटले आहेत. परंतु, प्रथमच येथील सत्ता तरुणांच्या हाती देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या संरपचांमध्ये सगळ्यात तरुण सरपंच व उपसरपंच गावाला मिळाले आहेत.

सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यावेळी सरपंचपदी सतीश शेळके तर उपसरपंचपदी पंडित जाधव यांची निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी सतीश शेळके व उपसरपंच पदासाठी पंडित जाधव यांचे एकमेव अर्ज आल्याने दोन्ही पदांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ११ जागांसाठी लढविलेल्या निवडणुकीत पॅनलप्रमुख संदीप शेळके यांच्या भाजपा पुरस्कृत श्री केदारेश्वर ग्रामविकास पॅनलने ११ जागांवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविली. विरोधी रमेश मुरकुटे यांच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. यावेळी नवनिर्वाचित सदस्य ज्योती विलास मोरे, वर्षा कृष्णा जाधव, वत्सला रतन जाधव, बाबासाहेब राऊत, ज्ञानेश्वर जाधव, सरसाबाई नामदेव कांबळे, कासाबाई उत्तम तांबडे, शारदा विलास काळे, गीता संतोष मैद आदी सदस्यांनी मतदान केले. यावेळी नवनिवार्चित पदाधिकाऱ्यां सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निर्वाचन अधिकारी म्हणून वल्लभ भोसले, तलाठी ज्ञानेश्वर गाडेकर, ग्रामसेविका के. एल. रोकडे यांनी काम पाहिले.

फोटो

गावात विकासाची कमतरता असून, निवडणूक काळात मतदारांसमोर गावविकासाची संकल्पना घेऊन गेलो होतो. जनतेने आमच्यावर विश्वास टाकून भरघोस मतांनी विजयी केले. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करून विकासासाठी कटिबध्द असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.

-----------------------------