कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 21:55 IST2022-10-27T21:55:39+5:302022-10-27T21:55:48+5:30
कुंभार पिंपळगाव ( जालना ) : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना दि२७ ...

कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर गोळीबार
कुंभार पिंपळगाव ( जालना) : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना दि२७ ऑक्टोबर रोजी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगाव येथील अंबड पाथरी रस्त्यावरील मार्केट कमिटी गाळातील आनंद किराणा दुकानात दुकानदार आदेश पांडुरंग चांडक (वय 26) या व्यापाऱ्यावर रात्री आठच्या सुमारास अज्ञात दोन इसमाने गल्ल्यातील रक्कम दे म्हणून पिस्तूलातून गोळी झाडली. यात किराणा दुकानदार यांच्या हातातील पंजावर गोळी लागली असून त्यांना अंबड येथील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे. पुढील तपास घनसावंगी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन करीत आहे.