तीर्थपुरीत दोन दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:57 IST2018-04-13T00:57:21+5:302018-04-13T00:57:21+5:30

एका गादी घरासह अ‍ॅटो पार्ट्सच्या दुकानाला गुुुरुवारी दुपारी आग लागली. आगीत तयार गाद्या व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

Fire in two shops in Tirthapuri | तीर्थपुरीत दोन दुकानांना आग

तीर्थपुरीत दोन दुकानांना आग

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : येथील एका गादी घरासह अ‍ॅटो पार्ट्सच्या दुकानाला गुुुरुवारी दुपारी आग लागली. आगीत तयार गाद्या व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
तीर्थपुरी अंबड रस्त्यावर शेख ईस्माईल यांचे दोस्ताना गादी घर आहे. दुपारी गादी तयार करण्यासाठी मशीनमधून रुई काढत असताना दुकानाला अचानक आग लागली. यात रुई मशीन, रुई व तयार गाद्या जळाल्याने ५० हजारांचे नुकसान झाले. बाजूलाच असलेल्या सावता वाजे यांच्या जय बालाजी अ‍ॅटो या दुकानातील साहित्यही आगीमुळे पेटले. यात आॅईल, स्पेअर पार्टस जळाल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. नागरिकांनी धावपळ करत आगीवर नियंत्रण मिळविले.
धावड्यात टेलरिंंगचे दुकान खाक
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेख नजीर शेख उस्मान यांच्या टेलरिंंगच्या दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातील पाच मशीन, ग्राहकांचे शिलाईसाठी आलेले कपडे, दुकानातील अन्य साहित्य व फर्निचर आगीत खाक झाले. दुसऱ्या मजल्यावर शेख कुटुंबीय राहत असलेल्या घरातील संसार उपायोगी साहित्यही जळाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. शेजारच्या घरालाही आगीने घेरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी धावपळ करत मदतकार्य केले. जवळ असलेल्या बोअरवेल सुरू करत ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविले. गुरुवारी सकाळी तलाठी नंदकिशोर कटारे, पारध ठाण्याचे जमादार आर. एस. सरदार, एस. जी. डुकरे यांनी पंचनामा केला.

Web Title: Fire in two shops in Tirthapuri