जालन्यात अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:22 IST2019-03-30T00:22:18+5:302019-03-30T00:22:41+5:30
औद्योगिक वसाहतीतील मूलचंद फुलचंद अग्रवाल जिनिंग प्रेसिंगमधील गोदामाला शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांच्या कपाशीच्या गाठी जळाल्या.

जालन्यात अग्नितांडव
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना /चंदनझिरा : येथील औद्योगिक वसाहतीतील मूलचंद फुलचंद अग्रवाल जिनिंग प्रेसिंगमधील गोदामाला शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांच्या कपाशीच्या गाठी जळाल्या. रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळाले नव्हते. जालना, औरंगाबाद, परतूर आणि भोकरदन येथील अग्निशमन दलाच्या सात बंबांव्दारे आग विझविण्यात येत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत आग धुमसतच होती.
चंदनझिरा येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतील त्रिमुर्ती चौकात अशोक अग्रवाल यांच्या मालकीच्या मुलचंद फुलचंद अग्रवाल जिनिंग मिलला अचानक लाग लागून कापसाच्या गोदामात ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कापसाच्या गाठी जळाल्या.
आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीच्या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी जाऊन तीन बंबाव्दारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोदामात सर्वत्र कापसाच्या गाठी असल्याने आगीवर रात्री पर्यंत नियंत्रण मिळवले नव्हते. औरंगाबाद, परतूर, भोकरदन येथूनही बंब बोलावले होते, अशी माहिती अग्शिमन अधिकारी गंगासागरे यांनी दिली.
येथील जिनिंग मिल मध्ये आग लागण्याची दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.