..अखेर डाव्या कालव्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:14 IST2019-01-25T00:14:34+5:302019-01-25T00:14:55+5:30
जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून गुरुवारी डाव्या कालव्यात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

..अखेर डाव्या कालव्यात पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून गुरुवारी डाव्या कालव्यात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा
परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.
पैठणच्या डाव्या कालव्या अंतर्गत पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, मानवत, पाथ्री, सेलू आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र येते. त्यामुळे या परिसरात असलेल्या रबी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शेतकरी डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करीत होते. त्यानुसार जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून गुरुवारी सकाळी डाव्या कालव्यात पाणी सोडले. याचा शेतक-यांच्या पिकांना फायदा होणार आहे.
लोकमतचे वृत्त खरे ठरले
२१ जानेवारी रोजी लोकमतने जायकवाडीतून डाव्या कालव्याला पाणी सुटणार असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने २४ जानेवारी रोजी डाव्या कालव्यात पाणी सोडले. सोडलेल्या पाण्याचा शेतक-यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याने परिसरातील शेतक-यांनी आनंद व्यक्त केला.