शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाच महिन्यांनंतर पंकज चौधरीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागात रोखपाल पदावर कार्यरत असलेला पंकज चौधरी व उपअभियंता विकास मधुकर सगदेव यांनी ...

जालना : जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागात रोखपाल पदावर कार्यरत असलेला पंकज चौधरी व उपअभियंता विकास मधुकर सगदेव यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना आदींची रक्कम लेखाशीर्षात जमा न करता स्वत:च्या खात्यात वर्ग करून २५ लाख रुपये हडपले होते. या प्रकरणी १५ जुलै २०२० रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस मुख्य संशयित आरोपी पंकज चौधरी याच्यासह अन्य आरोपींच्या मागावर होते. अखेर गुरुवारी कदीम जालना पोलिसांनी पंकज चौधरीला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.

जालना जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागात रोखपाल पदावर असलेल्या पंकज चौधरी याने २०१९मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना, घरबांधणी कर्ज, व्यवसाय कर व आयकर आदींची रक्कम लेखाशीर्षात जमा न करता स्वत:च्या खात्यात वर्ग केली होती. ही बाब जुलै २०२०मध्ये उपअभियंता प्रमोद खोत यांच्या लक्षात आली. त्यांनी याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणी चौकशी लावण्यात आली होती. चौकशीत पंकज चौधरी याने उपअभियंता विकास सगदेव यांच्या मदतीने २५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण निर्मळ यांच्या फिर्यादीवरून पंकज बाबूराव चौधरी व विकास मधुकर सगदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पंकज चौधरी व विकास सगदेव हे दोघे फरार होते. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी बुधवारी पंकज चौधरी याची औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होती. याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याच्या सपोनि बनसोड यांना मिळाली. या माहितीवरून पथक पाठवून त्यांनी चौधरीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बनसोड, पोलीस कर्मचारी विठ्ठुल खार्डे यांनी केली.