दाभाडीत पंधराशे पेंढ्या कडबा जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:44 IST2019-03-12T00:44:46+5:302019-03-12T00:44:56+5:30
बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी पाराजी धोंडीबा टेकाळे यांच्या शेतातील कडब्याच्या आग लागून १५०० पेंढ्या आणि भूस जळाल्याची घटना रविवारी घडली.

दाभाडीत पंधराशे पेंढ्या कडबा जळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी पाराजी धोंडीबा टेकाळे यांच्या शेतातील कडब्याच्या आग लागून १५०० पेंढ्या आणि भूस जळाल्याची घटना रविवारी घडली.
शेतकरी पाराजी टेकाळे यांच्या गट क्रमांक ३२४ मध्ये शाळू ज्वारीच्या कडब्याची गंजी केली होती. रविवारी दुपारी अचानक कडब्याच्या गंजीला आग लागल्याने कडबा जळाला तसेच परिसरात असलेली तुरीचे भूस, आणि शेतीचे साहित्य जळाले. परिसरात आधीच आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची कमतरता आहे. घटनेचा तलाठी ए.वाय.पठाण यांनी पंचनामा केला.