शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबीच्या फूलगळतीमुळे शेतकरी चिंतेत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात मोसंबीच्या अंबिया बहराची फूलगळ होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी ...

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात मोसंबीच्या अंबिया बहराची फूलगळ होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. त्यानंतर अंबिया बहर फुटलाही होता. परंतु, सध्या अंबिया बहराची फूलगळ होत असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अंबिया बहर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात फुटतो. यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना ताण देता आला नाही. तसेच मशागतही करता आली नाही. यामुळे अंबिया बहराचे नियोजन कोलमडले होते. त्यातच मागील २० ते २५ दिवसांपासून अंबिया बहर फुटत आहे. परंतु, सध्या फूलगळ होत असल्याने शेतकरी चिंतेत्त सापडले आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. मोसंबीच्या अंबिया बहराच्या फूलगळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी १९:१९:१९ हे खत द्यावे, असे तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मोसंबीचा अंबिया बहरही फुटला होता. परंतु, सध्या फूलगळ होत आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कृृषी विभागाने मार्गदर्शन करावे.

- प्रताप ढेंबरे, शेतकरी, निपाणी पिंपळगाव