शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, ...

जळगाव सपकाळ : नगदी पीक म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र, भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची बेभाव विक्री करत आहे.

भोकरदन तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहिल्याने एक लाख तीन हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यात ४२ हजार ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. कपाशीला पाते व बोंड लागण्याच्या काळातच पाऊस झाल्याने पातेगळ झाली. त्यानंतर बोंड अळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी औषध फवारणीवर मोठा खर्च करुन रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परतीच्या पावसाने कापूस घरात येण्याच्या काळातच थैमान घातल्याने उत्पादन घटले. पावसाच्या भीतीने बहुतांश शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून मजूर आणून जास्तीची मजुरी देऊन कापूस वेचून घरी आणला. कापसाचे भाव वाढल्यास लागवडीवर झालेला खर्च निघेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी घरात कापसाची साठवण केली. सुरुवातीला कापसाला ५४०० ते ५५०० रूपयापर्यंत भाव मिळाला होता. परंतु, त्यानंतर भावात घसरण झाली. सध्या ५ हजार २०० रूपये प्रति क्विंटल भाव आहे. भाव वाढत नसल्याने बहुतांश शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री करीत आहे. परंतु, व्यापारी कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. मागील सहा वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. यंदा चांगले उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उपन्नाची अपेक्षा होती. परंतु, अवेळी पडलेला पाऊस व भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच अतिवृष्टीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक हतबल झाले आहे. दुसरीकडे बाजारपेठेत शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतीसाठी लागवड केलेला खर्च देखील निघत नाही. सध्या व्यापारी कापूस कमी भावात मागत असल्याने ३० क्विंटल कापूस घरात पडून आहे. कापूस विकावा तरी संकट, नाही विकावा तरी संकट.

गणेश मुठ्ठे, शेतकरी.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपाशीचे गठाण व सरकीलाच अपेक्षित भाव व मागणी नसल्याने कापसाचे दर कोसळले आहे. सध्या शेअर बाजारदेखील कोसळले आहे.

नरेश ताडे, कापूस व्यापारी

रविवारपर्यंत जिनिंग बंद

बहुतांश शेतकरी सीसीआय केंद्राकडे वळाले आहेत. सीसीआय केंद्रात आतापर्यंत एक लाख सोळा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सध्या सीसीआय केंद्रात कापूस ठेवण्यास जागा नसल्याने रविवारपर्यंत जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहे.

दादाराव दळवी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना.