शेतकरीच करतील सर्व्हर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:58 IST2018-07-23T00:58:16+5:302018-07-23T00:58:40+5:30
: वर्षभरापासून सुरु असलेला कर्जमाफीचा घोळ, बोंडअळीचे अनुदान मिळण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आलेला असतांनाच आता सर्व्हर डाऊनमुळे पीकविमा भरण्यासाठी मोठी फरपट होत असल्याने सरकारने शेतकऱ्यांची कसोटी घेऊ नये नसता शेतकरी सरकारचे सर्व्हर डाऊन केल्याशिवाय थांबणार नाहीत, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

शेतकरीच करतील सर्व्हर डाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वर्षभरापासून सुरु असलेला कर्जमाफीचा घोळ, बोंडअळीचे अनुदान मिळण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आलेला असतांनाच आता सर्व्हर डाऊनमुळे पीकविमा भरण्यासाठी मोठी फरपट होत असल्याने सरकारने शेतकऱ्यांची कसोटी घेऊ नये नसता शेतकरी सरकारचे सर्व्हर डाऊन केल्याशिवाय थांबणार नाहीत, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.
सध्या पीकविमा भरण्यास शेतक-यांना अनंत अडचणी येत आहेत. पीकविम्याची मुदत आॅगस्ट अखेरपर्यंत वाढवावी तसेच बँकांनी आॅफलाईन पीकविमा स्वीकारावा, अशी मागणी त्यांनी केली.