वडीगोद्रीत बँकेसमोर शेतकऱ्याची लूट तर जालन्यात नोकरदाराची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:56 AM2019-11-19T00:56:58+5:302019-11-19T00:57:16+5:30

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली

Farmer loot in front of bank | वडीगोद्रीत बँकेसमोर शेतकऱ्याची लूट तर जालन्यात नोकरदाराची बॅग लंपास

वडीगोद्रीत बँकेसमोर शेतकऱ्याची लूट तर जालन्यात नोकरदाराची बॅग लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/ वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली. या घटना सोमवारी सायंकाळी घडल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील शेतकरी अशोक बाबूराव पांढरे यांना केवळ एक एकर शेती आहे. त्यामुळे उसतोड करुन ते आपल्या संसाराचा गाडा चालवितात. अशोक पांढरे यांनी एक एकर शेतीवर वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून कर्ज काढले होते. मुलगी आजारी असल्याने सोमवारी कर्जातील १५ हजार रूपये काढण्यासाठी ते वडीगोद्री शाखेत आले. हातात पैसे घेऊन ते शाखेच्या बाहेर पडताच दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम हिसकावून घेत पोबारा केला. या प्रकरणी पांढरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पैसे हिसकावल्याने अशोक पांढरे यांचा पाय घसरून ते पायºयावर पडले. तोपर्यंत त्यांना लूटणाºया चोरट्यांनी औरंगाबाद- बीड महामार्गावरील बोगद्यातून पळ काढला. नागरिकांच्या मदतीने पांढरे यांनी त्या चोरट्यांचा माग काढला. मात्र, ते फरार झाले होते. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
जालना येथे खाजगी नोकरी करणारे अशोक कृष्णराव क्षीरसागर हे सोमवारी सायंकाळी पैसे असलेली बॅग घेऊन सायकलवरून जात होते. ते मामा चौकात आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून त्यांच्याकडील ५५ हजार रूपये असलेली बॅग घेऊन पळ काढला. या प्रकरणी क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि झलवार हे करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Farmer loot in front of bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.