शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

आज सादर झालेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. त्यात विशेष करून आरोग्य, ...

आज सादर झालेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. त्यात विशेष करून आरोग्य, तसेच आत्मनिर्भर भारत योजनेसाठीची तरतूद लक्षणीय आहे. स्वस्त घरावरील सवलत यंदाही कायम ठेवल्याने समाधान व्यक्त होत आहे. एकूणच करदात्यांवर जो चार टक्के अधिभार लावला आहे, ही बाब करदात्यांसाठी निराशादायक म्हणावी लागेल.

दिनेश राठी, व्यवस्थापकीय संचालक आयकॉन स्टील, जालना

छायाचित्र क्रमांक ०१जेएनपीच ३०

----------------------------------------

जीएसटीतील सवलती महत्त्वाच्या

केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजनांची आज घोषणा अर्थसंकल्पात केली. याचे चांगले परिणाम येण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागेल. उद्योगांसाठी आत्मनिर्भर योजनेला जो निधी ठेवला आहे, तो भविष्यात कामी येणार आहे. जीएसटी कायद्यातही बदल केले असून, पोर्टलवर नोंदणी केल्यावरच इनपूटची मागणी करता येणार आहे. या जीएसटीमुळे अनेक उद्योजक, व्यापारी हैराण होते. करांमध्ये सूट दिली असती तर आणखी बरे झाले होते.

सुरेंद्र पित्ती, व्यवस्थापकीय संचालक एसआरजे स्टील, जालना

छायाचित्र क्रमांक ०१ जेएनपीच २७

--------------------------------------------

स्टार्टअपला प्रोत्साहन देणारे बजेट

आत्मनिर्भर भारत योजनेतून युवकांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासह उद्योग उभारणीला चालना देण्यासाठी स्टार्टअप इंडिया ही याेजना आधीच जाहीर केली आहे. या उद्योगांना याही वर्षी कुठलाच कर आकारण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. त्यामुळे उद्योगजगताला उभारी मिळून नवीन उद्योजक निर्माण होतील. कॉर्पोरेट क्षेत्राला कुठलाच कर न आकारल्याने उद्योगांना चालना मिळणार आहे.

कैलास लोया, व्यवस्थापकीय संचालक राजुरी स्टील, जालना

छायाचित्र : ०१ जेएनपीएच २९

----------------------------------------

कृषी क्षेत्राला महत्त्व दिल्याचा आनंद

आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला दिलासा देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात एक जिल्हा एक पीक, तसेच पशुसंवर्धनासाठीदेखील जी भरीव तरतूद केली आहे ती शेतीपूरक उद्योग म्हणून महत्त्वाची ठरणार आहे. शेतीच्या सिंचनासाठी महत्त्व दिले असून, एकूणच शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यातून शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. जैवक्रांतीला आणखी चालना दिली असती तर आणखी बरे झाले असते.

समीर अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक कलश सीडस्‌, जालना

छायाचित्र क्रमांक ०१जेएनपीएच २८

------------------------------------------

जास्तीत जास्त चांगले देण्याचा प्रयत्न

आजच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. स्टील उत्पादकांसाठी परदेशातून येणाऱ्या स्क्रॅपवर अडीच टक्के आयात शुल्क होते. ते रद्द करून मोठा दिलासा दिला आहे. घरांसाठीची सवलत कायम ठेवली आहे. वीज वितरणात आणखी सातत्य आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी जी तरतूद केली आहे, ती देखील उल्लेखनीय म्हणावी लागेल.

डी.बी. सोनी, व्यवस्थापकीय संचालक मेटारोल इस्पात, जालना

छायाचित्र क्रमांक ०१जेएनपीएच ३१

---------------------------------------------