मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात; मनोज जरांगे यांचा इशारा 

By विजय मुंडे  | Updated: December 20, 2023 13:32 IST2023-12-20T13:31:13+5:302023-12-20T13:32:01+5:30

मनोज जरांगे यांचा आरक्षण लढ्यातील पाचव्या टप्प्यातील दौरा आजपासून सुरू होत आहे.

Elections do not take place if Maratha reservation is not given; Warning of Manoj Jarange | मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात; मनोज जरांगे यांचा इशारा 

मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात; मनोज जरांगे यांचा इशारा 

वडीगोद्री (जि.जालना) : फेब्रुवारीच्या अधिवेशनात क्युरिटीपिटेशनवरील आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. परंतु, ती आमची मागणी नाही. आमच्या मागणीनुसारचे आरक्षण २४ डिसेंबरच्या आतच मिळणार आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन होणार असले तरी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ते विशेष अधिवेशन क्युरिटीपिटीशबाबतच्या आरक्षणासाठी आहे आणि ते मिळाले तरी एनटी, व्हीजेएनटीसारखे टिकेल की नाही हा प्रश्न आहे. दोन महिने घ्यायचे आणि नंतर पुन्हा आरक्षणासाठी लढायचे, असे आता आम्हाला करायचे नाही. त्यामुळे आमच्या मागणीनुसार आम्हाला २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावे. आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. शासनाने आरक्षण देण्याचे कबुल केले आहे. देणार कसे ते स्पष्ट करावे आणि राहिलेले दोन शब्द घेणे आवश्यक आहेत. आपण ते सरकारच्या कानावर घातले आहेत.

आरक्षण लढ्यातील पाचव्या टप्प्यातील दौरा आजपासून सुरू होत आहे. शांततेचे आवाहन करण्यासाठी, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हा लढा सुरू आहे. २३ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेत घराघरातील मराठा एकत्र येणार आहे. सरकारने आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

Web Title: Elections do not take place if Maratha reservation is not given; Warning of Manoj Jarange