जालन्यात अर्जुन खोतकर सभापती असलेल्या बाजार समितीवर 'ईडी'चा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 03:34 PM2021-11-26T15:34:38+5:302021-11-26T15:40:40+5:30

ED Raid In Jalana अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी देखील ईडीकडून तपासणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

ED raids market committee chaired by Arjun Khotkar in Jalana | जालन्यात अर्जुन खोतकर सभापती असलेल्या बाजार समितीवर 'ईडी'चा छापा

जालन्यात अर्जुन खोतकर सभापती असलेल्या बाजार समितीवर 'ईडी'चा छापा

googlenewsNext

जालना : शिवसेनेचे (Shiv Sena ) माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar ) सभापती असलेल्या बाजार समितीच्या कार्यालयावर आज सकाळी ईडीने ( ED Raid In Jalana ) छापा टाकला. तसेच खोतकर यांच्या निवासस्थानी देखील सकाळी सात वाजेच्या सुमारास ईडीच्या जवळपास १६ जणांच्या पथकाने तपासणी केल्याची जोरदार चर्चा  शहरात आहे. औरंगाबादेत भाजपच्या किरीट सोमय्या यांनी माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर काही दिवसांतच हो कारवाई झाली आहे, हे विशेष. 

येथील बाजार समितीचे २००७ पासून अर्जुन खोतकर हेच सभापती आहेत. आता जानेवारीमध्ये या बाजार समितीच्या निवडणुका प्रस्तावित होत्या. परंतु, त्या पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, आज ईडीने नेमके कुठले दस्ताऐवज तपासले हे समजू शकले नाही. खोतकरांच्या निवासस्थानी ही अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष फेरफटका मारला असता, कार्यालयाचे दरवाजे बंद करून कागदपत्रांची झाडाझडती घेतली जात असून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

या संदर्भात अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत भाजपच्या किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर साखर कारखान्याचा व्यवहारात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तसेच शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन खोतकर बळकावणार असल्याचे आरोपही सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात सर्व कागदपत्रे राज्य आणि केंद्र सरकारकडे देऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यात झालेल्या ईडीच्या धाडीकडे पाहिले जात आहे. 

Web Title: ED raids market committee chaired by Arjun Khotkar in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.