जालना शहरात ईस्टर संडेनिमित्त प्रभात फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:44 IST2018-04-02T00:42:14+5:302018-04-02T11:44:21+5:30
टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चमधून इस्टर संडेनिमित्त पहाटे प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये ख्रिश्चन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जालना शहरात ईस्टर संडेनिमित्त प्रभात फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चमधून इस्टर संडेनिमित्त पहाटे प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये ख्रिश्चन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पहाटे चार वाजता प्रभात फेरीला सुरवात झाली. उड्डाणपुल,शनि मंदीर, गांधी चमन, रेल्वे स्टेशन मार्गे काढण्यात आलेल्या फेरीचा टॉप डॉप्सन चर्चमध्ये समारोप करण्यात आला. येथे झालेल्या कार्यक्रमास चर्चचे अध्यक्ष बी. बी. पाळक, , सचिव जार्ज उगले नगसेविका मनिषा विजय कांबळे, प्रेमानंद लालझरे, अश्विन सिंग, कैलास अंभोरे, अनिल कांबळे, सिमोन सुतार, संदीप कांबळे आदींची उपस्थिती होती. बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथेही सकाळी फेरी काढण्यात आली. यामध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दुपारी येथील क्राईस्ट चर्चमध्ये रेव्ह सोजवळ यांनी येशू ख्रिस्तांच्या पुर्नरत्थानाबाबत मार्गदर्शन केले. या वेळी पास्टरेट कमिटीचे देवराव मोटे, पेत्रस आठवले, ऐलिया आठवले, थोमा आठवले, शालूमन आठवले, सुनील आठवले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.