Each Gauthana drone will be calculated by camera | प्रत्येक गावठाणाची ड्रोन कॅमेऱ्याव्दारे होणार मोजणी
प्रत्येक गावठाणाची ड्रोन कॅमेऱ्याव्दारे होणार मोजणी

ठळक मुद्देग्रामपंचायतींना कळणार आपली हद्द : गावकऱ्यांना मिळणार मालमत्ता कार्ड

गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची ड्रोन कॅमे-याव्दारे मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजाच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतींना आपली हद्द देखील माहित नव्हती. शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने एका क्लिकवर गावातील गावठाणाची माहिती मिळणार आहे. याचा फायदा ग्रामपंचायतींसह प्रशासनाला होणार आहे.
इंग्रजांच्या राजवटीपासून गावातील गावठाणाची मोजणी झालीच नव्हती, यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला गावठाणाची आपली हद्द कीती याची माहिती नव्हती यामुळे जागेच्या कारणावरुन अनेक वेळा वादविवादाच्या घटना घडतात. यामुळे ग्रामविकास विभागाने राज्यातील प्रत्येक गावठाणाची ड्रोन कॅमे-याव्दारे मोजणी करुन त्याचे डिजिटालायजेशन करण्यात येणार आहे. गावठाणाची मोजणी झाल्यानंतर गावातील प्रत्येक घरमालकाला डिजीटल मालमत्ता कार्ड दिले जाणार असून, या योजनेअंतर्गत हद्द गावचे गावठाण भूमापण करुन मिळकत पत्रिका स्वरुपात अभिलेख शासकीय स्तरावर तयार केले जाणार आहे.
भूमीअभिलेख कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात युध्दपातळीवर काम सुरु करण्यात आले असून, बदनापूर तालुक्यातील ७८ गावातील गावठाणच्या मोजणीला प्रारंभ करण्यात आला आहे.
प्रत्येक गावाच्या गावठाणची मोजणी झाल्यानंतर ड्रोन कॅमे-याने प्रत्येक घर आणि शासनाची जागा मोजली जाणार आहे.
जालना जिल्ह्यातील जवळपास ७०० पेक्षा अधिक ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया ९५२ गावातील गावठाण हद्द निश्चित करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घेतली जाणार आहे.
या मोजणीमध्ये गावातील अंतर्गत रस्ते , घर, तसेच मोकळ्या जागेचे नकाशे तयार करून त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.

Web Title: Each Gauthana drone will be calculated by camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.