लग्नसराईमुळे रेल्वे, बसस्थानकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:59 IST2018-04-26T00:59:23+5:302018-04-26T00:59:23+5:30

बुधवारी लग्नतिथी अत्यंत दाट असल्याने कडक उन्हातही लग्नाचे मुहूर्त साधण्यासाठी नातेवाईकांची लगीनघाई दिसून आली.

Due to marriage rush, bus station rush | लग्नसराईमुळे रेल्वे, बसस्थानकात गर्दी

लग्नसराईमुळे रेल्वे, बसस्थानकात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बुधवारी लग्नतिथी अत्यंत दाट असल्याने कडक उन्हातही लग्नाचे मुहूर्त साधण्यासाठी नातेवाईकांची लगीनघाई दिसून आली. बुधवारी जालन्याचा पारा हा ४० अंशांवर पोहोचला होता. त्यातच बस आणि रेल्वेतील गर्दीमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
लग्नसराईमुळे जालना बसस्थानकात सकाळपासूनच गर्दी होती, वेगवेगळ्या गावांना जाण्यासाठीच्या बसफेऱ्या अपु-या असल्याने अनेकांनी खाजगी वाहनांचा आधार घेत मुहूर्त गाठल्याचे चित्र होते. बसमध्ये जागा मिळावी म्हणून अनेकांनी खिडकीतून हातरूमाल तसेच बॅग टाकण्यासाठी जिवाचा आटापिटा करत होते. बस प्रमाणेच रेल्वेमध्ये देखील अशीच तुफान गर्दी दिसून आली.
विशेष करून हैदराबादकडून येणा-या पॅसेंजर रेल्वे या तीन-तीन तास उशिराने धावत असल्याने एक्सप्रेस रेल्वेचे तिकिटांचा दर जास्त असला तरी, तो देऊनही अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला.

Web Title: Due to marriage rush, bus station rush