शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

दुष्काळाचा पंचनामा; जिल्ह्यात ना चारा.. ना पाणी...ना छावणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:59 IST

एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने पुन्हा एकदा दगा दिला आहे. याचे परिणाम एकूणच शेती आणि ग्रामीण भागावर भीषणतेने जाणवत आहेत. एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते ते, शिवसेनेकडून गेल्या तीन दिवसांमध्ये थेट २२ गावांमध्ये जाऊन आॅन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यात आला. यावेळी कुठलेच राजकारण न करता केवळ दुष्काळावरच शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर दुष्काळाची दाहकता मन हेलावून टाकणारी आहे.जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला. यातूनच शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण जीवन पूर्णपणे कोलमडले आहे. जालना तसेच लगतच्या बदनापूर तालुक्याचा दौरा गेल्या तीन दिवसांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली. ते म्हणाले की, आज ज्या गावात आम्ही थेट गेलो तेथे आमचे स्वागत हे नेहमीप्रमाणे आनंदाने केले नाही, पटकन कोणी पाणी आणि चहा घ्या, असेही म्हटले नाही. परंतु आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना नाराज न करण्याची परंपरा आहे, त्यामुळे जड मनाने ‘या बसा, कोणी कडे दौरा केला? अद्याप निवडणुका लांब आहेत, तुम्ही प्रचार आतापासून सुरू केला का? कोण आहे आपला उमेदवार?’ असे एक ना अनेक प्रश्न विचारण्यात येते होते.मात्र आम्ही प्रचारासाठी नव्हे तर वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्यावर बसण्यास सतरंजी अथवा घोंगडी आणण्याची लगबग सुरू होत असते. एकूणच आज गावातील गुरांचा सांभाळ हा माणसांपेक्षाही महाग झाला आहे. एक चाºयाची पेंडी ही ४० रूपयांवर पोहोचली आहे. दिवसभरातून एका बैलाला किमान पाच पेंड्या लागतात तर किमान दहा ते १२ बारा लिटर पाणी लागते. हे आणायचे कुठून, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी केला. चारा छावणीला का दावणीला या प्रश्नात अद्याप प्रशासन गुंतले आहे. जिल्ह्यात एवढी भयावह दुष्काळी स्थिती असताना एकही चारा छावणी सुरू झाली नसल्याने शेकºयांनी आश्चर्य व्यक्त केले. टँकर सुरू करण्यासाठी देखील नियमांचा बागूलबुवा केला जात आहे. एकूणच महिलांनी देखील आपल्या पाणी आणण्यासाठीच्या व्यथा मोठ्या विदारकपणे मांडल्या.जालना जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रशासन काहीच करत नाही, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ग्रामीण भागात जगणे अवघड झाले आहे. प्रशासनाकडून दुष्काळी भागात मदत करत असताना थोडेफार नियम हे लवचिक करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेलाच नियमावर बोट ठेवून चालल्यास परिस्थिती निवळणे अवघड होणार आहे. आज चा-याचे भाव गगनाला भिडले असून, आगामी काळात चाºयाचे भाव प्रतिशेकडा हे ५ हजार रुपयांवर पोहचतील, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांना सर्वकाही मदत ही सरकार आणि प्रशासनाकडून मिळेल, हे शक्य नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. अनावश्यक होणा-या खर्चाला फाटा देवून शेतक-यांना मदत करण्याची हीच खरी वेळ असल्याचे दौ-यातून दिसून आल्याची माहिती भास्कर अंबेकर यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईGovernmentसरकार