शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : निसर्गाने दिले अन् निसर्गानेच हिरावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:12 IST

दुष्काळवाडा : म्हसरूळ गावात बारा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. या गावात १९७२ नंतर पहिल्यादांच निसर्गाचा असा प्रकोप पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

- प्रकाश मिरगे, म्हसरूळ, ता. जाफराबाद, जि. जालना

यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता आणि तो प्रारंभी खराही ठरला. त्यामुळे जूनमध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. मात्र, नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने निसर्गाने दिले अन् निसर्गानेच हिरावले असे म्हणण्याची वेळ जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील शेतकऱ्यांवर आली.

म्हसरूळ गावात बारा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. या गावात १९७२ नंतर पहिल्यादांच निसर्गाचा असा प्रकोप पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गावाचे जीवनमान शेतीव्यवसावर अवलंबून आहे. मात्र, सलग चार वर्षांपासून गावात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांच्या उत्पन्नात घट आली आहे. लाखो रुपयांचे बियाणे, खते टाकूनही पावसाअभाची मुद्दलही निघाले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

पावसाअभावी शेतीची कामे थंडावली असून, रोजगार हमी योजनेच्या कामांनाही अद्याप प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे शेतमजुरांवर कामासाठी स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे. त्यातच शेतीची कामे यंत्राच्या साहाय्याने होऊ लागल्याने आज हाताला काही कामच उरले नाही. म्हसरूळचे पेरणीलायक क्षेत्र १ हजार ६८ हेक्टर असून, प्रमुख पिके कापूस, सोयाबीन, मका आहेत. कापसाने पावसाअभावी जमिनीच्या वर डोके काढले नाही. सोयाबीन फुलात येण्याआधीच करपून गेले आहे. पाऊस न झाल्याने साठवण तलाव कोरडेठाक आहेत. यामुळे आतापासून टँकरची मागणी होत आहे.

खरिपाची पिके हाताची गेली जाफराबाद तालुक्यात खरिपाची पिके पावसाअभावी हाताची गेली आहेत. पावसाअभावी तालुक्यात रबीच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शासनाच्या निकषावर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्व्हे करण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. - शेराण पठाण, तालुका कृषी अधिकारी, जाफराबाद

बळीराजा काय म्हणतो?- आतापर्यंतचा हा सर्वात वाईट दुष्काळ आहे. सोयाबीनला एकरी एक ते दीड क्विंटल उतारा मिळत आहे. आशा वेळी जगायचे कसे, हा प्रश्न आहे. - भास्कर गुलाबराव जाधव 

- चार-पाच वर्षांपासून परिसरात नदी-नाल्यांना पूर येईल, असा पाऊसच पडला नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. टँकरने विकत पाणी घेऊन फळबागा जिवंत ठेवल्या आहेत. आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता सतावत आहे. - साहेबराव भीमराव डोळस 

- माझ्याकडे एक हेक्टर शेती आहे. त्यात कापूस, मका या पिकांची लागवड केली होती. कापसाला पाणी आणि कीडनियंत्रणासाठी खर्च झाला. मक्याला एक कणिसही लागले नाही. - सोमनाथ दामोदर चौधरी 

- पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. खर्च करुनही उत्पन्न हाती लागले नाही. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. - उमेश रमेश पिंपळे 

- शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याची आमची मागणी आहे. - कृष्णा दत्तात्रय लहाने 

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसagricultureशेतीMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी