कर्णमधुर सुरांनी जालनेकरांचा दिवाळीचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:42 AM2018-11-06T00:42:01+5:302018-11-06T00:42:06+5:30

आली माझ्या घरी ही दिवाळी... काटा रुते कुणाला...ऋुणानुबंधाच्या गाठी...ने.. मजसी ने.. परत मात्रुभूमीला... या आणि अशा अनेक भाव, भक्ती, हिंदी गाण्यांनी जालेकनरांच्या दिवाळीचा श्रीगणेशा झाला.

Diwali celebreted with musical concert | कर्णमधुर सुरांनी जालनेकरांचा दिवाळीचा श्रीगणेशा

कर्णमधुर सुरांनी जालनेकरांचा दिवाळीचा श्रीगणेशा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आली माझ्या घरी ही दिवाळी... काटा रुते कुणाला...ऋुणानुबंधाच्या गाठी...ने.. मजसी ने.. परत मात्रुभूमीला... या आणि अशा अनेक भाव, भक्ती, हिंदी गाण्यांनी जालेकनरांच्या दिवाळीचा श्रीगणेशा झाला. सुरांची लयलूट करत रसिका जोशी आणि अनिरुद्ध जोशी यांनी आपल्या गोड गळ्यातून जालनेकर रसिकांना साडेतीन तास एका वेगळ्या भाविश्वात नेले होते.
निमित्त होते ते, दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे येथील संस्कृती मंचच्यावतीने मुंबई, पुण्यात रूजलेला हा कार्यक्रम जालन्यातही व्हावा या हेतून रूक्मिणी परिवार आणि संस्कृती मंचच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आणि या दिवाळी पहाट कार्यक्राने दशकपूर्ती साजरी करून ११ व्या वर्षात पदार्पण केले. सोमवारी धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी सणाची खऱ्या अर्थाने सुरवात होते. सोमवारी सकाळी सहा वाजता सूर्याची किरणे पडण्याच्या आता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरांनी किरणांचे स्वागत केले. दिवाळी सण हा उत्साह आणि आनंदाचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात येणाºया प्रत्येक रसिकाच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता. नेहमीच्या धकाधकीच्या आणि चिंतेच्या विश्वातून आजच्या टीव्ही आणि मोबाईलच्या युगात थेट कार्यक्रमांना रसिक प्रेक्षक आजही तेवढेच प्राधान्य आणि दाद देत असल्याचे दिसून आले.
प्रसिध्द गायक अनिरूध्द जोशी आणि रसिका जोशी यांच्यातील स्वरांच्या मैफलीने जालनेकर प्रारंभापसून मंत्रमुग्ध झाले होते. सूत्रसंचालन करणाºया पार्थ भावसारने जालन्यातील रसिकेतेचा इतिहास सांगून ही परंपरा जालनेकर आजही तेवढ्याच तन्मयतेने जपत असल्याबद्दल कौतुक केले. काटा रूते कुणाला...या नाट्यगीतामध्ये ज्येष्ठ साहित्यिक शांताबाई शेळके यांनी भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या प्रसंगातील दोन मित्रांच्या गैर समजातून हे गीत कसे रचले गेले, याचा किस्सा सांगितल्यावर उपस्थित रसिक भावूक झाला होता. तसेच कवी प्रदीप दवणे यांची चिंब पावसात.. हे गीत त्यांना मे महिन्यात सुचल्याची माहिती दिली, तसेच अनेक गीता पाठीमागिल इतिहास आणि त्याचे वेगळेपण कसे आहे, याच्या आठवणी त्यांनी सांगून मैफलिस चारचाँद लावले.

Web Title: Diwali celebreted with musical concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.