उपअधीक्षकांकडून घरातील महिलेचा वेष, तर कर्मचारी शेत मजुरांच्या रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:30 IST2021-05-21T04:30:56+5:302021-05-21T04:30:56+5:30
दोन दिवसांपासून आम्ही केवळ खिरडकर आणि लाच देणाऱ्यांच्यावर पाळत ठेवून होतो. गुरुवारी अखेर या मोहिमेला सापळा यशस्वी झाल्याने मोठे ...

उपअधीक्षकांकडून घरातील महिलेचा वेष, तर कर्मचारी शेत मजुरांच्या रूपात
दोन दिवसांपासून आम्ही केवळ खिरडकर आणि लाच देणाऱ्यांच्यावर पाळत ठेवून होतो. गुरुवारी अखेर या मोहिमेला सापळा यशस्वी झाल्याने मोठे यश आले. अंभोरेने दोन लाख रुपयांची लाच घेताच आम्ही ठरलेला इशारा केला आणि अंभोरे जाळ्यात अडकला. त्याला जाळ्यात अडकल्याचे कळल्यावर तो हतबल झाला. ही लाच कोणाच्या सांगण्यावरून घेतली याची पोपटपंची त्याने पंचासमक्ष उघड केली. यावरून नंतर खिरडकर आणि खार्डे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.
कडवंची परिसरात खळबळ
शेती आणि घर असा दिनक्रम असलेल्या कडवंची शिवार आज दोन लाखांच्या लाचेमुळे संपूर्ण राज्यात पोहोचले. एरवी कडवंची हे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली जाते. परंतु आज संपूर्ण परिसरात एकच चर्चा ऐकू आली. जो-तो हे कसे झाले असेच एकमेकांना विचारताना दिसून आले.