धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 06:12 IST2025-11-08T06:11:53+5:302025-11-08T06:12:56+5:30
पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले

धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना): खोट्या रेकॉर्डिंग करून बदनाम करणे, खून करणे किंवा औषध, गोळ्या देऊन घातपात करणे, असा कट रचण्यात आला होता आणि ही सुपारी धनंजय मुंडे यांनी दिल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला. पोलिसांकडे तक्रार केली असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याबाबत जरां यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.
ऐकवले कॉल रेकाॅर्डिंग
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी संशयित आरोपींमधील संभाषण आणि धनंजय मुंडे यांच्यासमवेत गाडी देण्याबाबत झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकवले. नार्को टेस्टसाठी आपण तयार आहाेत, असेही ते म्हणाले.
‘त्या’ दोघांना पाच दिवसांची कोठडी
जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी अमोल खुणे, विवेक उर्फ दादा गरुड या दोघांविरूद्ध गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.