शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:28 IST2018-11-19T00:27:45+5:302018-11-19T00:28:00+5:30
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे रविवारी घडली

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे रविवारी घडली. नुरा अमजद तांबोळी (२५) असे मयत महिलेचे नाव आहे.
येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अमजद तांबोळी याच्या घराला सकाळी नऊ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र घर बाहेरुन बंद होते असे सांगण्यात येत आहे. नुरा तांबोळी या लागलेल्या आगीत सापडून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड, पोलीस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचानामा केला. हा अपघात आहे की, घातपात यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांनी सांगितले. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार अंकुश पाटोळे करत आहेत