लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शेळ््यांना खाण्यासाठी आंब्याच्या झाडावर चढून पाला तोडत असताना अचानक झाडात वीज प्रवाह उतरल्याने शॉक लागून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कोसगाव येथे सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. शुभम राजू सुलताने असे मृत झालेल्या मुलाचे नावआहे.शुभम सुलताने हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे पिंपळगाव ते माळेगाव रस्त्यावर असलेल्या माळेगाव शिवारातील पांडुरंग भिका सोनुने यांच्या शेतात शेळ््यांना चारण्यासाठी घेऊन गेला होता. शेळ््यांना खाण्यासाठी हिरवा पाला मिळावा म्हणून तो आंब्याच्या झाडावर चढला. सुरुवातीला त्याने शेळ््यांना पाला तोडून दिला. आणि पुन्हा पाला तोडण्यासाठी तो झाडाच्या वरील फांदीवर गेला असता झाडाच्या वरून गेलेल्या मुख्य विजेच्या तारांचा प्रवाह अचानक झाडात उतरल्याने शुभम याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना माहिती कळविली.या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, भोकरदन पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
झाडात विजेचा प्रवाह उतरल्याने मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:49 IST