CoronaVirus : जालन्यात दिवसभरात तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 20:51 IST2020-05-13T20:50:24+5:302020-05-13T20:51:00+5:30

सकाळी एक आणि सायंकाळी दोन असे एकाच दिवशी तीन रूग्ण आढळून आल्याने खळबळ

CoronaVirus: three positives in a day at Jalana ; total 17 patients | CoronaVirus : जालन्यात दिवसभरात तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १७ वर

CoronaVirus : जालन्यात दिवसभरात तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १७ वर

जालना :  जिल्ह्यात बुधवारी आणखी तीन जणांना कोरोनीच लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी सकाळी एक आणि सायंकाळी दोन असे एकाच दिवशी तीन रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

यात एक परतूर तालुक्यातील सातोना येथील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकाचा समावेश असून, एक जालना तालुक्यातील रामनगर येथील रहिवासी आहे. राज्य राखीव दलाच्या आणखी एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. राखीव दलातील सात जण कोरोना बाधित झाले आहेत.  त्यामुळे बुधवारी सांयकाळपर्यंत जालन्यातील कोरोना बाधितांची संख्या ही १७ वर पोचली आहे. 

विशेष म्हणजे मालेगाव येथून भोकरदन येथे आलेल्या ६० पेक्षा अधिक जवानांचे स्वॅब हे गुरूवारी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.

Web Title: CoronaVirus: three positives in a day at Jalana ; total 17 patients