CoronaVirus News : जालन्यात १६ जणांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 12:40 IST2020-06-29T12:39:28+5:302020-06-29T12:40:03+5:30
सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

CoronaVirus News : जालन्यात १६ जणांना कोरोनाची बाधा
जालना : जिल्ह्यातील १६ जणांचा अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ५२१ वर गेली आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून रविवारी ५० जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
बाधित रुग्णांमध्ये जालना शहरातील ढवळेश्वर भागातील एक, जांगडेनगर मधील एक, मंठा चौफुली परिसरातील एक, मोदीखाना येथील दोन, गोपालपुरा येथील एक, बन्सीपुरा येथील एक, आरपी रोडवरील एक, खाजगी रूग्णालयातील एक, बारवागल्ली येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बदनापूर शहरातील कैलासनगर मधील एक, जाफराबाद येथील एक, रामगोपालनगर येथील एक, मानेपुरी येथील एक व परतूर शहरातील एकाचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ५२१ वर गेली आहे. त्यातील १३ जणांचा बळी गेला असून, ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.