coronavirus : जालन्यात ५ रुग्णांची भर; खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:02 IST2020-05-20T09:01:40+5:302020-05-20T09:02:21+5:30

एकजण मुंबईहून आलेला पॉझिटिव्ह

coronavirus: 5 more patients in Jalana; Four employees of a private hospital tested positive | coronavirus : जालन्यात ५ रुग्णांची भर; खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी पॉझिटिव्ह

coronavirus : जालन्यात ५ रुग्णांची भर; खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी पॉझिटिव्ह

जालना : येथील कोविड रूग्णालयास मंगळवारी रात्री आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात कोरोनाबाधितांवर उपचार करणा-या खासगी रूग्णालयातील चार कर्मचा-यांसह शिरनेर (ता.अंबड) येथील मुंबई रिटर्न एका व्यक्तीचा समावेश आहे.

अंबड तालुक्यातील शिरनेर येथील काही व्यक्ती मुंबईहून गावाकडे परतले होते. त्यांना तपासणीसाठी जालना येथील जिल्हा रूग्णालयात तीन दिवसांपूर्वी पाठविण्यात आले होते. या व्यक्तीसह कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या शहरातील खासगी रूग्णालयातील कर्मचाºयांचे स्वॅबही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी रात्री प्राप्त अहवालानुसार मुंबईहून आलेल्या शिरनेर येथील व्यक्तीसह जालना येथील खासगी रूग्णालयातील चार कर्मचाºयांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४१ वर गेली असून, त्यातील सातजण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: coronavirus: 5 more patients in Jalana; Four employees of a private hospital tested positive