Corona's fourth victim in Jalna; 65-year-old woman dies | जालन्यात कोरोनाचा चौथा बळी; ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

जालन्यात कोरोनाचा चौथा बळी; ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

ठळक मुद्दे१०४ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आजवर जिल्ह्यातील चौघांचा बळी गेला आहे.

घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथील एका ६५ वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी मुंबई येथून गावी परतली होती. तिला शारीरिक त्रास होऊ लागल्याने तीन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. दमा, रक्तदाब आदी आजार असलेल्या या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्वॅब तपासणीनंतर समोर आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात आजवर चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या १८६ वर गेली असून, ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित १०४ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Corona's fourth victim in Jalna; 65-year-old woman dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.