शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४ लाख ५० हजार जणांनी घेतली कोरोना लस; दररोज होतेय ५० हजार जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 19:07 IST

Corona vaccine कोरोना लसीकरणाचे काम राज्यभर सुरू आहे. फ्रंटलाइनवर कर्तव्य बजावीत असलेल्यांसाठी लसीकरण टप्प्या-टप्प्याने सुरू आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.आता महसूल, पोलीस प्रशासनासह नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

जालना : कोरोना लसीकरणात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली गेली. आता पोलीस, महसूल व नगरपालिका कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत ४ लाख ५० हजार जणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते. कोरोना लसीकरणाचे काम राज्यभर सुरू आहे. फ्रंटलाइनवर कर्तव्य बजावीत असलेल्यांसाठी लसीकरण टप्प्या-टप्प्याने सुरू आहे. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता महसूल, पोलीस प्रशासनासह नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. राज्यात आजवर साडेचार लाख जणांना लस देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनीही लस टोचून घेण्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात दररोज ५० हजार जणांना लस देण्याचे काम सुरू असल्याचेही टोपे म्हणाले.

त्याच क्षणी मीही लस टोचून घेईनलसीकरणात कोणा-कोणाला समाविष्ट करून घ्यायचे, याचे निर्देश केंद्र सरकारकडून प्राप्त होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापपर्यंत राजकीय नेत्यांना लस देण्याचे आदेश दिलेले नाहीत. त्यांची सूचना ज्या दिवशी येईल, त्याच क्षणी मी लस टोचून घेईल, असेही टोपे म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रस्ताव मंत्रिमंडळ स्तरावरवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. बुलडाणा, परभणी व जालना येथील प्रस्तावांवर आरोग्यमंत्री या नात्याने मी स्वाक्षरी केलेली आहे. आता हे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येतील. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहेच, तेथील प्रवेश प्रक्रिया या वर्षात सुरू होण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJalanaजालनाRajesh Topeराजेश टोपे