पारडगाव येथे कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:24+5:302021-04-14T04:27:24+5:30

घनसांवगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी ...

Corona vaccination campaign started at Pardgaon | पारडगाव येथे कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात

पारडगाव येथे कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात

googlenewsNext

घनसांवगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी आरोग्य सभापती कल्याण सपाटे, संजय गांधी निराधार अध्यक्ष भागवत सोळंके, रोजगार हमी योजना अध्यक्ष रवी आर्दड, आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे, सरपंच शशिकला खरात, उपसरपंच चंद्रभूषण जयस्वाल, भास्कर ढेरे, शिवाजी भालेकर, रवींद्र ढेरे, सय्यद शौकत, डॉ. प्रिया होळकर, रामदास बोनगें, एस. एस. घोगरे, जावेदखान, रवींद्र शिरसाट, रेखा कुमावत, सुनीता खरात, सुनीता डोळझाके, डॉक्टर गर्जे, गाढवे यांची उपस्थिती होती.

ही लसीकरण मोहीम आरोग्य उपकेंद्राअंतर्गत राबविण्यात येत असून, प्रत्येक आठवड्याला लसीकरण करण्यात येईल. रांजणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सहा उपकेंद्र असून, टप्प्याटप्प्याने कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. कंडारी आणि पारडगाव येथे लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. मासेगाव उपकेंद्रातही लवकरच लस सुरू केले जाईल, जास्तीत-जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी वाघमारे यांनी केले आहे.

फोटो

पारडगाव येथे ८२ वर्षीय महिला लसीकरण करताना दिसत आहे.

Web Title: Corona vaccination campaign started at Pardgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.