शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे जालन्यात सर्वधिक १८५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

जालना : मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल ३६८ जणांचा बळी गेला आहे. यात सर्वधिक जालना तालुक्यातील १८५ जणांचा ...

जालना : मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल ३६८ जणांचा बळी गेला आहे. यात सर्वधिक जालना तालुक्यातील १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २८६ जणांचा तर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ८२ कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण सोडले आहेत.

जालना जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनस्तरावरून प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रारंभी मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपर्यंत २० हजार २१ कोरोना संशयित आढळून आले आहेत. ८५ हजार ३३४ आरटीपीसीआर तपासण्या, तर ३४ हजार ९२ रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आरटीपीएसआर तपासणीत ११ हजार ५२५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तर रॅपिड ॲण्टीजेन तपासणीत २३०५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात एकूण १३ हजार ८३० रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३६८ जणांचा बळी गेला. तर, आजवर १३२९७ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाचे आढळणारे रुग्ण पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक मृत्यूची नोंद

गत १० महिन्यांत ३६८ जणांचा बळी गेला आहे. यात सर्वधिक ऑगस्ट २०२० मध्ये ६८ जणांचा, सप्टेंबर २०२० मध्ये ६८ जणांचा, ऑक्टोबर- २०२० मध्ये ६७ जणांचा तर जुलै- २०२० या महिन्यामध्ये ६५ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या प्रारंभी मे महिन्यात केवळ एक बळी गेला होता. मृत्यूंची संख्या जुलै महिन्यापासून अधिक वाढली होती. तर रुग्णालयीन उपचारानंतर नोव्हेंबर महिन्यापासून बळींची संख्या कमी झाली.

जालना तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

जिल्ह्यातील ३६८ बळींपैकी सर्वाधिक बळी हे जालना तालुक्यातील नागरिकांचे गेले आहेत. जालना तालुक्यात एकूण १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील ६३ जणांचाही बळी उपचारादरम्यान गेला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मंठा तालुक्यात केवळ आठ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. बदनापूर तालुक्यात ११ तर परतूर तालुक्यात १३ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लिंगनिहाय जिल्ह्यातील मृत्यू

पुरुष २६०

महिला १०८

अंबड ३७

बदनापूर ११

भोकरदन १६

घनसावंगी १८

जाफराबाद १७

जालना १८५

मंठा ०८

परतूर १३

इतर जिल्हे ६३

मे ०१

जून १५

जुलै ६५

ऑगस्ट ६८

सप्टेंबर ६८

ऑक्टोबर ६७

नोव्हेंबर ३३

डिसेंबर ३२

जानेवारी १८

फेब्रुवारी १

एकूण रुग्ण १३८३०

कोरोनामुक्त झालेले १३२९७

एकूण कोरोना मृत्यू ३६८