शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटांच्या दरावरून कंत्राटदार - प्रशासनात न्यायिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

राज्य सरकारने वाळू घाटांचे लिलाव करताना राज्यपातळीवर पर्यावरण समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडे सर्व वाळू घाटांचे प्रस्ताव पाठवून ...

राज्य सरकारने वाळू घाटांचे लिलाव करताना राज्यपातळीवर पर्यावरण समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडे सर्व वाळू घाटांचे प्रस्ताव पाठवून त्यांना मंजुरी घेण्यातच वर्ष लोटले. त्यातच कोरोनाचाही मोठा फटका या लिलावाला बसला आहे. दरम्यान, वाळू घाटांचे लिलाव नसल्याने वाळूचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. हे दर वाढल्याने बांधकामावर विपरीत परिणाम झाला आहे.

ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी वाळू घाटांच्या लिलावास परवानगी दिली. त्यानुसार जालना जिल्ह्याचा विचार केल्यास २२ वाळू घाटांचे लिलाव करण्यास परवानगी दिली. तसेच ऑनलाईन पद्धतीने हे लिलाव झाले; परंतु हे लिलाव झाल्यावर मंठा येथील कैलास बोराडे यांनी या लिलावात ज्या वाळू घाटांच्या किमती वेगवेगळ्या जिल्ह्यात ठरविल्या आहेत, त्या मान्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करून याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी सुनावणी घेऊन बोराडे यांना दिलासा दिला नाही. दरम्यान, यात बोराडे यांचे वकील पालोदकर यांनी सांगितले की, २०१९ मध्ये जो जीआर काढला होता, त्यात परभणी, जालना, हिंगोली, बुलडाणा येथून वाहणाऱ्या नद्या एकच असून, त्यातील वाळूदेखील सारखीच आहे. त्यामुळे हे वेगवेगळे दर कशामुळे, असा मुद्दा उपस्थित केला. तसेच दर ठरविताना जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून ते ठरविणे आवश्यक होते. तसे झाले नसल्याचे पालोदकर यांनी सांगितले. परंतु प्रत्येक नदीतून होणारा वाळूचा उपसा हा वेगवेगळा असल्याने तसेच दर ठरललले नसल्याचे सरकार पक्षाचे वकील ॲड. काळे यांनी सांगितले. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकल्यावर याचिका दाखल करणाऱ्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता कैलास बोराडे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात असल्याचे बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.