आर्मीत निवड झाल्याबद्दल सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:38+5:302021-07-08T04:20:38+5:30
रस्त्यावर खड्डे जालना : तालुक्यातील जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड ...

आर्मीत निवड झाल्याबद्दल सत्कार
रस्त्यावर खड्डे
जालना : तालुक्यातील जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
ग्रामसेविका डी.पी. भालके यांना निरोप
जालना : तालुक्यातील गुंडेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात मागील आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आदर्श ग्रामसेविका डी.पी. भालके यांना ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी निरोप देण्यात आला. ग्रामसेविका भालके यांची नुकतीच भाटेपुरी येथे बदली झाली आहे. यावेळी सरपंच मनोहर पोटे, उपसरपंच सुमनबाई गजर, प्रा. अर्जुन गजर, ग्रामसेेेवक अभिमन्यू खैरे, नारायण गजर, रेखा गजर, सुनीता वाकुडे, भास्कर पट्टेकर, वैजिनाथ वैद्य, शंकर गजर, रामदास गजर आदी हजर होते.
विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
जालना : रिजनल लेव्हल वर्म्युअल बाल महोत्सवात राज्यातून ३४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बाल महोत्सवामध्ये एकूण आठ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत जालना शहरातील नेतल कामड हिने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत द्वितीय, प्रज्ञा दीपक दराडे हिने स्टोरी टेलिंग या स्पर्धेत तिसरा तर शिवम अंकुश टापरे याने क्ले मॉडेलिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
साठे स्मारक समितीतर्फे कार्यक्रम
जालना : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यावर्षी अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले असून, १ ऑगस्ट रोजी साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात छाईपुरा येथे मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, रक्तदान शिबिर, मान्यवरांचा सत्कार, वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्याचे ठरले आहे.
वाढत्या वीज बिलाबाबत कंदील भेट
मंठा : बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आणि महिला आघाडीच्या वतीने वाढत्या वीज बिलाच्या विरोधात मंगळवारी तहसीलदारांना कंदील भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार प्रल्हाद दवणे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अनिता हिवाळे, शितल वाघ, भीमराव वाघ, राजेश खनपटे, संदीप शेजुळे, पांडुरंग बोने आदी उपस्थित होते.
वीर हुतात्मा सांडूजी वाघ जयंती साजरी
जालना : मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर हुतात्मा सांडूजी सखाराम वाघ यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर येथे नाभिक सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला दत्तात्रय वरपे, गोपाळ सुरडकर, अनिल पुंगळे, निवृत्ती पुंगळे, मुख्याध्यापक बाहेकर, मिसाळ, बाबुराव पुंगळे यांची उपस्थिती होती.
विजयसिंग महेर यांची अध्यक्षपदी निवड
जालना : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी विजयसिंग महेर यांची राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी, योगेंद्र कटियार, राज शेखावत यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय महासचिव आनंदसिंह ठोके, बाळासाहेब पाटील, अर्जुनसिंह ठाकूर, सोनाली ठाकूर, सशांकसिंह राजपूत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्रस्तरीय डिजिटल क्लासरूमचा शुभारंभ
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रूक येथे केंद्रस्तरीय डिजिटल क्लासरुम सुरु करण्यात आले असून, याचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी डॉ. सतीश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक राजेंद्र परिहार, सरपंच संतोष ठाकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर फुलमाळी, मुख्याध्यापक सोळूंके, विलास शिदे, सुनील ताठे आदी उपस्थित होते.