शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:41 IST

१३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभेची लगीनघाई आता तोंडावर आली आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. भाजपला सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक मातबर नेते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. शनिवारीच चार आमदारांनी आपली भोकरदन येथील निवासस्थानी भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केला.येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ओबीसी समाजातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, प्रा. भगवानसिंग डोबाळ, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.संजय राख, आदींची उपस्थिती होती. यावेळी गोदावरी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, लक्ष्मण वडले यांची उद्योग महामंडळाच्या सदस्यपदी तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे, डॉ. भागवत कºहाड यांची मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल तर प्रवीण घुगे यांची बालक हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी आ. नारायण मुंडे हे होते. दानवे म्हणाले, आमचे आणि शिवसेनेचे ठरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी कुठलेही विचार मनात आणू नयेत. लोकसभा निवडणुकीत माझ्यात आणि अर्जुन खोतकरांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नव्हते, ती एक नाटकीय घडामोड होती. त्या अंकावर आता पडदा पडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून, शनिवारी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचेही दानवेंनी सांगितले. दानवेंनी निवडणूक आचारसंहिता कधी लागेल हे निवडणूक आयोगाच्या आधीच सांगितल्याने निवडणूक कार्यक्रम फुटला की काय, अशी चर्चा होती. सूत्रसंचालन गजानन गिते यांनी केले.जातनिहाय जनगणना करणारदेशासह महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना गेल्यावेळीच जातनिहाय जनगणना होणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी सरकार आमचे नव्हते. आता सरकार आमचे असून, २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आम्ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाश्वासन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेOBCअन्य मागासवर्गीय जाती