परतुरात दामिनी पथकाकडून रोडरोमिओंची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:46 IST2019-07-19T00:46:34+5:302019-07-19T00:46:44+5:30
शाळा महाविद्यालयासमोर थांबून टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंना दामिनी पथकाने हिसका दाखवत चांगलीच धुलाई केली.

परतुरात दामिनी पथकाकडून रोडरोमिओंची धुलाई
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर: शाळा महाविद्यालयासमोर थांबून टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंना दामिनी पथकाने हिसका दाखवत चांगलीच धुलाई केली. तर पाच जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
परतूर शहरातील शाळा महाविद्यालयासमोर अकारण थांबून मुलींची छेड काढणे, वाहने वेगाने चालवणे, शेरेबाजी करणे इ. प्रकार वाढले होते. याविषयी ‘लोकमत’ने बुधवारी रोडरोमिओंच्या उपद्रवासंबंधी वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत गुरूवारी दामिनी पथकाने शहरातील शाळा महाविद्यालया समोर थांबणा-या रोडरोमियोंचा चांगलाच समाचार घेतला.
तसेच पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. या दामिनी पथकात पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोकॉ. एस. एम. खांडेभराड, आर एल. राठोड, ए. डी. साबळे, यू. पी. साबळे यांचा समावेश होता.
यावेळी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव म्हणाल्या की, अकारण शाळा, महाविद्यालया समोर व सार्वजनिक ठिकाणी थांबून मुलींची छेड काढणाºया रोमिओ विरूध्दची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज देण्यात आली असल्याचेही जाधव यांनी सांगितले.