हौदात पडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 01:15 IST2020-01-16T01:14:31+5:302020-01-16T01:15:03+5:30

पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यृ झाल्याची घटना अंबड तालुक्यातील ठाकूरवाडी येथे बुधवारी घडली

Child dies in hood | हौदात पडून बालकाचा मृत्यू

हौदात पडून बालकाचा मृत्यू

जामखेड : पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यृ झाल्याची घटना अंबड तालुक्यातील ठाकूरवाडी येथे बुधवारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. शिव गजानन काळवणे (२) असे मृत बालकाचे नाव आहे.
शिव घराबाहेरील पाण्याच्या हौदात जवळ खेळत होता. हौदाजवळ असलेल्या दगडावरती रांगत - रांगत तो उभा राहिला असता, त्याचा अचानक तोल जाऊन तो हौदात पडला. हौदात पाणी असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यृ झाला.

 

Web Title: Child dies in hood