केंद्र सरकारने गरिबांची चेष्टा थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:59+5:302021-02-08T04:26:59+5:30

सुरेखा लहाने : दरवाढीविरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन टेंभुर्णी : एका हाताने द्यायचे अन् दुसऱ्या हाताने घ्यायचे. ही गोरगरिबांसाठी ...

The central government should stop mocking the poor | केंद्र सरकारने गरिबांची चेष्टा थांबवावी

केंद्र सरकारने गरिबांची चेष्टा थांबवावी

सुरेखा लहाने : दरवाढीविरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

टेंभुर्णी : एका हाताने द्यायचे अन् दुसऱ्या हाताने घ्यायचे. ही गोरगरिबांसाठी घातक असलेले नीती बंद करून केंद्र सरकारने आता गरिबांची चेष्टा थांबवावी, असा आक्रोश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सुरेखा लहाने यांनी केला. सरकारच्या इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंंग्रेसतर्फे जाफराबाद तालुक्यातील पापळ फाट्यावर दरवाढ निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मोफत गस देऊन गोरगरीब महिलांची चुलीच्या धुरातून मुक्तता करण्याचा कांगवा सरकार जरी करीत असले तरी आज गगणाला भिडलेले गैसचे दर पाहता गरीब महिलांना पुन्हा चुलीशिवाय पर्याय उरलेला नाही. सरकारनेच हसविले अन् सरकारनेच रडविले, असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ सामान्यांवर आली आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी जाधव यांनीही तीव्र शब्दात सरकारच्या दरवाढीचा निषेध केला. या आंदोलनात ज्योती सवडे, उषा गाडेकर, छाया सवडे, सय्यद महेमुदा, सुनीता निकाळजे, अश्विनी घोडसे आदींनी सहभाग घेतला.

फोटो-

जाफराबाद तालुक्यातील पापळ फाट्यावर सरकारच्या दरवाढ धोरणाचा निषेध करताना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने, उपाध्यक्ष अश्विनी जाधव आदी.

-----------

Web Title: The central government should stop mocking the poor