जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जालन्यात कँडल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:45 IST2018-10-13T00:44:51+5:302018-10-13T00:45:28+5:30
वीज वितरण कंपनीने जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी तीन तास असे एकूण सहा तासांचे भारनिमयन सुरू केले आहे. यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे भारनिमयन रद्द करावे, या मागणीसह याचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी सायंकाळी गांधीचमन येथून कँडल मार्च काढण्यात आला.

जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जालन्यात कँडल मार्च
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीज वितरण कंपनीने जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी तीन तास असे एकूण सहा तासांचे भारनिमयन सुरू केले आहे. यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे भारनिमयन रद्द करावे, या मागणीसह याचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी सायंकाळी गांधीचमन येथून कँडल मार्च काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शाजीदा शेख, नगर पालिकेचे उपाध्यक्ष राजेश राऊत, राजेंद्र जाधव, संगीता जोशी, मीरा खरात, अर्चना ससाणे, सुनंदा पाटील, सुनंदा खंदारे, अर्चना खाडे, विजय कालेकर, वर्षा घोरपडे, यमुना चौधरी, लताबाई कटारे, विश्रांती घुमारे, कैलास मगरे, आदींची उपस्थिती होती.
यावेळी भारनियमन मागे घ्या.., यासह युती सरकारच्या नियोजना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.