The bus rolled along the road | बस रस्त्याच्या कडेला घसरली

बस रस्त्याच्या कडेला घसरली

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईड देताना साईडपट्ट्यावरील मातीमुळे बस रस्त्याच्या खाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हा प्रकार सोमवारी सकाळी तालुक्यातील ताडहादगाव फाट्यावर घडली.
अंबड आगाराची बस (क्र.एम.एच.०६- एस. ८५४५) ही सोमवारी सकाळी कुंभार पिंपळगाव येथून अंबडकडे येत होती. ही बस ताड हादगाव फाट्याजवळ आली असता एक ट्रॅक्टर समोरून आले. या ट्रॅक्टरला साईड देऊन पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना बस अचानक रस्त्याच्या खाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभा केली. या घटनेमुळे घाबरलेल्या प्रवाशांना बसच्या खाली उतरविण्यात आले. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्यावर घेतल्यानंतर पुढील मार्गावर मार्गस्थ झाली.

Web Title: The bus rolled along the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.