Burglary in Jalna city | जालना शहरात घरफोडी
जालना शहरात घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील जे. पी. सी. बँकेजवळील रहिवासी व्यापारी कन्हैयालाल पाटणी यांनी गोल्डन ज्युबली शाळेजवळ नवीन घर घेतले आहे. या नवीन घरामध्ये स्थलांतरित होण्यासाठी साहित्याची ने-आण सुरू होती. त्याच दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या जुन्या घरी कोणी नसल्याची संधी साधत शनिवारी मध्यरात्री डल्ला मारला. यामध्ये चार लाख रूपयांपेक्षा अधिकची रोकड, जवळपास दहा तोळे सोनं लंपास केले.
सदरबाजार पोलीस ठाण्याच्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर असलेल्या पाटणी यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Burglary in Jalna city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.