जालन्यात घरफोडी; झिरपी फाट्यावर दाम्पत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:05 AM2019-08-30T01:05:34+5:302019-08-30T01:06:08+5:30

चोरट्यांनी शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकी परिसरातील एक घर फोडून ६० हजारांचे दागिने, दुचाकी लंपास केली. अंबड तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ दाम्पत्यास मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले

Burglary in the fire; The couple beat up on a shrimp gate | जालन्यात घरफोडी; झिरपी फाट्यावर दाम्पत्यास मारहाण

जालन्यात घरफोडी; झिरपी फाट्यावर दाम्पत्यास मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चोरट्यांनी शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकी परिसरातील एक घर फोडून ६० हजारांचे दागिने, दुचाकी लंपास केली. अंबड तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ दाम्पत्यास मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. तर घनसावंगी तालुक्यातील घानेगाव शिवारातून २० हजार रूपयांच्या कोंबड्या चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जालना शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकीच्या पाठीमागील स्वराज रेसिडेन्सी मध्ये रमाकांत मधुकर बधनापूरकर यांचे घर आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ६० हजाराचा मुद्देमाल व एक १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी रमाकांत बधनापूरकर यांच्या तक्रारीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि मोरे हे करीत आहेत.
अंबड - शहागड मार्गावरील झिरपी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू आहे. या कामाजवळील एका टीनच्या शेडमध्ये सुनील आत्माराम जाधव हे बुधवारी रात्री पत्नी व मुलीसमवेत झोपले होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी शेडमध्ये प्रवेश करून दाम्पत्यास लाकडी दांड्याने मारहाण करीत त्यांच्याकडील ११ हजार ४०० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सुनील जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील घानेगाव गावच्या शिवारात गौतम किसनराव तिनगोटे यांचे शेत आहे. या शेतातील शेडमध्ये कोंबड्यांचे पालन करण्यात आले होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या शेडमधील २० हजार रूपये किंमतीच्या कोंबड्या चोरून नेल्या. या प्रकरणी गौतम तिनगोटे यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Burglary in the fire; The couple beat up on a shrimp gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.