Brave robbery in Maheshnagar | महेशनगरमध्ये धाडसी घरफोडी

महेशनगरमध्ये धाडसी घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरासह बेडरुमच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करुन बेडरूमध्ये असलेले पाच तोळे सोने व २० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना जालना शहरातील महेशनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महेशनगर भागातील रहिवाशी रवींद्र मिश्रीलाल बांगड यांच्या घरी ही चोरी झाली. मध्यरात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर बेडरुमचाही कडीकोंडा तोडून आत गेले. या बेडरुममध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख २० हजार रुपये लंपास केले आहे.
सोन्याच्या दागिण्यांमध्ये पाच अंगठ्या, एक बिंदी, दोन नथनी, दोन कानातले व दागिण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक यासीन खान हसन पठाण हे करीत आहेत. घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे.

Web Title: Brave robbery in Maheshnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.