दोघाना लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:15 IST2019-02-19T01:15:00+5:302019-02-19T01:15:23+5:30
दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी आणि एका खाजगी व्यक्तीला सातशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

दोघाना लाच घेताना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी आणि एका खाजगी व्यक्तीला सातशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
यामध्ये शेख महंमद आसिफ नसीर अहेमद आणि अमोल रत्नाकरराव जैन यांना गहाणखताची नोंद आॅनलाईन करून देण्यासाठी ही लाच मागितली. शेख हा दुय्यम निबंधक कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करतो तर अमोल जैन हे खाजगी इसम असून, मध्यस्थाची भूमिका ते करत असल्याचे सांगण्यात आले. एकूणच गृहकर्ज मंजूर झाल्याने संबंधित तक्रारदाराला त्यांची नोंद आॅनलाईन मालमत्ता प्रणालीमध्ये करून हवी होती. संबंधित तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानुसार हा सापळा लावण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक रवींद्र निकाळजे यांनी दिली. यावेळी पो.नि. आदिनाथ काशीद उपस्थित होते.